घरगुती भांडणे अन् चिमुकला जीवाला मुकला, डोक्यात गज लागल्याने १० महिन्याच्या मुलाचा मृत्यू, केडगाव येथील घटना..


दौड : तालुक्यातील केडगाव येथे भांडणात मुलाच्या डोक्यात लोखंडी गज लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. १०) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवधूत सचिन मेंगवडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आजिनाथ मेंगवडे हे केडगाव परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना अवधून नावाचा १० महिन्यांचा मुलगा आहे. मेंगवडे यांच्या घरात किरकोळ कारणावरून वादविवाद सुरू झाले. या भांडणात अवधूत याच्या डोक्याला लोखंडी गज लागला होता.

त्यानंतर सचिन यांनी त्याला तात्काळ केडगाव येथील रेनबो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये पाठविले.

दरम्यान, अवधूत याला विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घोषित केले. घरगुती भांडणात एका निष्पाप चिमूकल्याचा बळी गेला त्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!