लग्नाच्या पहिल्या रात्री डॉक्टर नवरा शरीरसंबंध ठेवू शकत नाही, ३१ वर्षीय शिक्षिकेने आरोप केला अन्…, घटनेने सगळे हादरले

उत्तर प्रदेश : डॉक्टर नवरा शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचा दावा करत ३१ वर्षीय शिक्षिकेने सासर सोडलं. त्यानंतर डॉक्टर नवऱ्याने बनावट आयडीद्वारे सोशल मीडियातून शिक्षिकेच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षिकेने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय शिक्षिकेने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी माझे लग्न शहापूर येथील एका डॉक्टरशी झाले.
त्यानंतर मी २० दिवस सासरी राहिले, पण माझ्या पतीने माझ्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मी विचारल्यावर त्याने सांगितले की, तो संबंध ठेवण्यास सक्षम नाही. त्यानंतर महिलेने आपल्या पतीच्या नपुंसकतेबद्दल माहेरी सांगितले. तेव्हा तिचे वडील सासरच्या घरी आले आणि तिला घरी घेऊन गेले.

यानंतर, डॉक्टर पतीने फेसबुकवर एक बनावट आयडी तयार केला. त्याद्वारे त्याने शिक्षिकेच्या दोन बहिणींबद्दल घाणेरड्या गोष्टी लिहून संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्यास सुरुवात केली. महिलेच्या तक्रारीवरून गोरखनाथ पोलीस ठाण्याने रविवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टर पती आणि त्याच्या वडिलांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोरखनाथ पोलीस हे सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.