सकाळी उठल्यावर डोकं दुखतं? असू शकतात ‘या’ गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या…


पुणे : अनेकांना सकाळी झोपेतून उठताच डोके जड होणे किंवा तीव्र वेदना जाणवतात. बहुतेक वेळा या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण सतत असे होत राहिल्यास शरीरात काही तरी बिघाड असल्याचे संकेत असू शकतात.

झोपेची कमतरता, तणाव, मायग्रेन, डिहायड्रेशन आणि स्लीप अप्निया ही सकाळच्या डोकेदुखीची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञ सांगतात की झोपेतून उठताना मेंदूची संवेदनशीलता वाढते, त्यामुळे वेदना लवकर जाणवतात. सकाळी डोके का दुखते आणि याची नेमकी कारणे काय ते आपण आज जाणून घेऊयात…

मायग्रेनची समस्या..

मायग्रेनने त्रस्त असणाऱ्यांना सकाळी डोके दुखणे सामान्य आहे. झोप कमी होणे, कडक ऊन, हवामान बदल आणि रिकाम्या पोटी झोपणे हे मायग्रेन ट्रिगर करतात, ज्यामुळे सकाळी तीव्र वेदना होतात.

दारू किंवा कॅफीनचा परिणाम..

रात्री दारू पिणे किंवा जास्त कॅफीन घेणे यामुळे सुस्त झोप येत नाही. तसेच अचानक कॅफीन सोडल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.

       

डिहायड्रेशन..

रात्री पाणी न पिणे आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि डोकेदुखी सुरू होते.

मायग्रेनची समस्या..

मायग्रेनने त्रस्त असणाऱ्यांना सकाळी डोके दुखणे सामान्य आहे. झोप कमी होणे, कडक ऊन, हवामान बदल आणि रिकाम्या पोटी झोपणे हे मायग्रेन ट्रिगर करतात, ज्यामुळे सकाळी तीव्र वेदना होतात.

झोपेची कमतरता किंवा खराब झोप..

रात्री पुरेशी झोप न घेणे, वारंवार झोप तुटणे आणि उशिरापर्यंत स्क्रीनसमोर राहणे, याचा थेट परिणाम सकाळच्या डोकेदुखीवर होतो. झोप कमी झाल्याने मेंदूत तणाव निर्माण होतो आणि सकाळी वेदना वाढतात.

तणाव आणि मानसिक दबाव…

जास्त तणावामुळे स्नायू आखडतात, विशेषतः मान आणि खांदे. यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो आणि सकाळी उठताच टेन्शन-टाइप डोकेदुखी सुरू होते.

स्लीप अप्निया..

स्लीप अप्नियामध्ये झोपेत श्वास वारंवार थांबतो. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सकाळी उठताच तीव्र डोकेदुखी, चक्कर आणि जडपणा येऊ शकतो. सतत घोरणे याचे लक्षण असू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!