…. असे पंतप्रधान यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत! शरद पवार असे का म्हणाले ..!!

बारामती : केंद्र सरकार मधील महत्त्वाचा पदावर बसलेली लोकं फक्त फोडाफोडी लक्ष देत आहे, पण देशातील शेतकरी, व्यापारी व कष्टकरी लोकांच्या भल्याकडे हे मात्र लक्ष देत नाहीत, देशाची अर्थिक स्थिती पाहण्यासाठी पंतप्रधानांकडे कसलाही वेळ नसून उलट राज्यातील निवडणूकांत तेथील मुख्यमंत्र्यांविषयी अवाच्च भाषेत टिका करणारा पंतप्रधान आपण यापूर्वी पाहिला नाही, अशी खरमरीत टिका राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत व्यापाऱ्यांशी बोलताना केली आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खा. व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापारी धोरण तसेच केंद्र सरकारच्या अर्थिक दृष्टीकोनावरभाष्य करुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती जळजळीत टिकास्त्र सोडले आहे.
शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार व्यापारी, शेतकरी धोरणाशी अजिबात संवाद ठेवलेला नाही. या वर्गातील अपेक्षित परिणामांवर चर्चा होताना दिसत नाही. ज्यांच्याकडे देशातील प्रत्येक घटकांची समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे. ते अर्थमंत्री कोणालाच भेटत नाहीत. संसदेतही एक तासही या विषयावर पंतप्रधानांनी चर्चा केली नाही. अशा धोरणांचा उल्लेख त्यांनी केला.
राजकीय घडामोडींवर टिकास्त्र सोडताना पवार यांनी असे देशाचे पंतप्रधान यापूर्वी पाहिले नाही असा उल्लेख करुन त्यांनी या सत्तेतील बसलेल्या प्रमुख मंडळी राजकीय पक्षांच्या पुढाफोडीत गांभीर्याने लक्ष देत आहे. आजवर अनेक पंतप्रधान झाले, परंतु या पंतप्रधानांनी कधीही कोणत्याही राज्यात गेल्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांविषयी अनुचित उद्गार काढलेले नाहीत. मात्र आता इतर राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने त्या राज्यात जाऊन भाषण करणाऱ्या पंतप्रधानांना आपण सर्वांनी ऐकले आहे.
दरम्यान शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.