संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नका, त्यांना अटक करा! पाटसमध्ये ओबीसी महासंघ आक्रमक, काढला निषेध मोर्चा


दौंड : तालुक्यातील पाटस येथे शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले नियोजित स्मारक ते विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच देऊळगाव गाडा येथील बेटपाटी येथेही भिडे यांच्या प्रतित्माक पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले , भारतीय राष्ट्रध्वज यांच्याबाबत अपशब्द व बदनामी करणाऱ्या संभाजी भिडे यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी.

अशी आक्रमक भूमिका घेत दौंड तालुक्यातील पाटस आणि देऊळगाव गाडा येथे सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून भिडेंचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

दरम्यान, सरकारने भिडेंना तातडीने अटक करावे, राज्यात कुठेही त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ, सरपंच रंजना पोळेकर, सत्यशोधक ओबीसी महासंघाचे दौंड तालुका प्रभारी रामचंद्र भागवत, कुरकुंभच्या माजी सरपंच जयश्री भागवत, शीतल भागवत, सारिका भुजबळ उपस्थित होते.

तसेच अरविंद गायकवाड, गोरख फुलारी आदींनी आपल्या भाषणात भिडे या मनुवादी प्रवृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. याप्रसंगी विशाल बारवकर, अरुण भागवत, गोरक्ष बारवकर, मनोहर कोकरे, प्रताप भागवत, प्रदिप भागवत, गोरख फुलारी, नवनाथ गायकवाड, निलेश बनकर, माऊली जाधव, वसंत साळुंखे, अमोल भागवत, प्रकाश भागवत, धनंजय भागवत, डी. डी. बारवकर, मंगेश रायकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!