Diwali Sweets : पुण्यात ही मिठाई खातेय भाव! चितळे बंधू मिठाईवाले यांनी बनवली सोन्याची मिठाई, जाणून घ्या किंमत…

Diwali Sweets : दिवाळीचा सण सुरु झाला आहे, दिवाळीत घरोघरी मिठाई भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. यावेळी लोक एकमेकांना मिठाई देखील भेट देतात. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या या सणामध्ये मित्र परिवार आणि आप्तेष्टांना मिठाई देऊन तोंड गोड करण्याची प्रथा आहे; तर हिंदू धर्मात मिठाई देऊन भेट वस्तू देणे, हा शुभसंकेत मानला जातो. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात मिठाईला असलेली मागणी इतर दिवसांच्या तुलनेत कमालीची वाढते. Diwali Sweets
फराळाच्या लाडू,चिवडा,चकली,अनारशांसह काजू कतली,सोनपापडी, गुलाबजाम आंबा बर्फी असे अनेक पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध असतात. मागच्या वर्षी प्रमाणेच यंदाही खवय्यांच्या पर्यायात भर टाकणारी आणि तोंडाला पाणी सुटेल, अशी शाही मिठाई यंदाही चितळे बंधू मिठाईवाले घेऊन आले आहेत. ती म्हणजे, खास ‘सुवर्ण मिठाई.
सोन्याचे आवरण असणारी ही मिठाई चितळेंच्या पुण्यातील सर्व स्टोअर्सवर काही प्रमाणातच उपलब्ध आहे. परंतु ही मिठाई फक्त ऑर्डरनुसार तयार करुन दिली जाईल. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असलात तरी ही ‘सुवर्ण मिठाई’ ऑर्डर करु शकता. सणासुदीनिमित्त खास ही आगळीवेगळी मिठाई मागील वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व खवय्यांसाठी नक्कीच विशेष आकर्षण ठरणार आहे. Diwali Sweets
काय आहे किंमत?
छोटा बॉक्स १६०० रुपये.
मोठा बॉक्स- ६००० रुपये.
दिवाळीत सगळ्यात आकर्षण असतं ते म्हणजे फराळ आणि मिठाईचं. त्यात अनेक प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. लाडूंचेदेखील वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या, चिवडा आणि बर्फीदेखील खवय्यांना आकर्षित करत असतात.
त्यात आता सध्या सुवर्ण मिठाईचा ट्रेंड सुरु आहे. अनेकांना गिफ्ट देण्यासाठी सध्या बाजारात नवनवे गिफ्ट उपलब्ध आहे. त्यात सगळ्यांची पसंती ही चविष्ठ मिठायांना दिली जाते. यात पुणेकर सध्या सुवर्ण मिठाईला पसंती देताना दिसत आहे.
दिवाळीच्या काळात सर्वत्र पसरलेला उत्साह, गजबजलेल्या बाजारपेठा असे अत्यंत सुखकारी आणि मांगल्यमयी वातावरण आहे. या वातावरणात मिठाई हा खवय्यांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. फराळाचे विविध प्रकार, मिठाई, सुकामेवा असे नानाविध प्रकार आपल्याला बाजारपेठात दिसतात.
आता त्यात ‘सुवर्ण मिठाई’ या अतिशय आकर्षक प्रकाराची भर पडली असून खवय्यांना ती नक्की आवडेल, असा विश्वास चितळे बंधू मिठाईवाले यांनी व्यक्त केला.