सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता महागाई भत्त्यात ४ नव्हे तर ८ टक्क्यांनी वाढ

गुजरात : गुजरात सरकारने भत्त्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ८ टक्क्यांनी वाढवला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मावळमधील सख्या बहिण-भावाने करून दाखवलं! एकाचवेळी पोलीस दलात निवड, सर्वत्र होतंय कौतूक
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काळजी घ्या! पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार..
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के डीएचा लाभ दिला जाणार आहे. महागाई भत्त्यांमधील ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.
एक काळ होता देशात 5 हजार आणि 10 हजारच्या नोटाही चलनातून केल्या होत्या बाद, कारण
यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र सर्वसामान्य लोकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. याचा फायदा ९.५० लाख सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना होणार आहे.