सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! पगारात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ, फडणवीस सरकारची मोठी घोषणा…

पुणे : राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारने बुधवारी केली. या निर्णयामुळे आता राज्यातील पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्के झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी आणि सुमारे ८ लाख ७२ हजार निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि अनुदानप्राप्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या महागाईच्या काळात हा मोठा आर्थिक आधार मानला जात आहे.
वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ च्या पगारापासून रोखीने मिळण्यास सुरुवात होईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील ४ महिन्यांची थकबाकी मार्च २०२६ मध्ये दिली जाईल. तर, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या ३ महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश लवकरच काढले जातील.
या वाढीव खर्चामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेऊन, संबंधित विभागांच्या मंजूर अनुदानातूनच हा खर्च भागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुढीपाढव्याच्या तोंडावर थकबाकी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी फेब्रुवारी-मार्चमध्येच साजरी होणार असल्याचे चित्र आहे.