नाशिकमध्ये दर्ग्यावरून वाद पेटला, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, अनेकांना घेतलं ताब्यात…

नाशिक : नाशिकमध्ये सध्या एक दर्गा चर्चेचा विषय बनला आहे. येथील काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
हा दर्गा अवैध आहे. त्यामुळे तो तोडला पाहिजे. या जागी हनुमानाचे मंदिर बनवले पाहिजे, असं हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. याठिकाणी महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याठिकाणी वातावरण तापले असून सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची धरपकड सुरू आहे. सकल हिंदू समाजाचे या दर्ग्यावरून सतत विरोध प्रदर्शन सुरू आहे. याठिकाणी सकाळपासूनच पोलीस दाखल झाले आहेत. तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तैनात आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून त्या ठिकाणी दर्गा बांधला आहे. असे हिंदू समाजाच्या लोकांचे म्हणणे आहे. यामुळे लोकांनी दर्ग्यावर जाऊन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन केलं आहे. हिंदू समाज संघटनांकडून होत असलेला विरोध आणि आंदोलनामुळे पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.