निवडणूक प्रचाराला या ! अन् मिळावा १५ दिवसात सात हजार रुपये… !
निवडणुकीच्या रणधुमाळीत वायरल 'ऑडीओ' क्लिपची चर्चा... !

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे.कसब्यातील निवडणकू अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसत या असताना आता निवडणुकीच्या प्रचारात एका ‘ऑडीओ क्लिप’ची चर्चा होत आहे.
निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी आता नेत्यांना कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळतय. दरम्यान, आता यासाठी पुण्यातील एका एजन्सीला प्रचारामध्ये लोक गोळा करण्यासाठी चक्क उमेदवाराने कॉन्ट्रॅक्ट दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील या एजन्सीने लोकांना पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल सात सात हजार रुपये देणार असल्याचे देखील सांगितले आहे. कसबा पेठेतील अनेक तरुणांना या एजन्सीच्या वतीने फोन गेलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांना सारसबागे जवळील एक ऑफिसमध्ये येण्यास सांगितले जात आहे. तसेच त्यांना पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये काम केल्यानंतर सात हजार रुपयांचा मोबदला देऊ,असं देखील सांगितलं जातंय.