Dilip Walse Patil : पतसंस्था घोटाळ्यात बुडालेले पैसे परत मिळवून देणार, मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय..


Dilip Walse Patil  मुंबई : मराठवाड्यात अनेक पतसंस्थांमध्ये लोकांचे पैसे अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष आहे. याबाबत आदर्श अनेक पतसंस्थांच्या कारभाराविरोधात आंदोलन देखील करण्यात येत आहे. Dilip Walse Patil

यासंबंधी सहकार आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असून लोकांचे पैसे परत करण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (ता.६) बोलताना दिली.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मराठवाड्यात अनेक सहकारी पतसंस्थांमधील घोटाळे उजेडात येत आहेत. त्यामुळे लोकांच्या कष्टाच्या ठेवीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदर्श बँक प्रकरणात मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील करण्यात आले. तर काही जणांनी पैसे बुडाल्यामुळे आत्महत्या देखील केल्या आहेत, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

तसेच अशा घटनांमुळे सहकार खात्याची बदनामी होते. तसेच सहकार चळवळीलाही धक्का पोहोचतो. या प्रकरणात सहकार आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या असून, पुढील कारवाई केली जात आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार गटाचाच असल्याचाही दावा केला. सद्यस्थितीत पक्षाच्या दोन्ही गटांनी आपला दावा सांगितला आहे. त्यावर निवडणूक आयोगात सुनावणी होणार असून, त्याच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे, असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!