वैष्णवीच्या ५१ तोळ्यांचे हगवणे कुटुंबाने केलं काय? आता नव्या माहितीने सगळेच हादरले..


पुणे : सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. याबाबत आता तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहेत. वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले ५१ तोळे सोनं हगवणे कुटुंबाने काय केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असताना याबाबत माहिती समोर आली आहे.

हे सोनं फेडरल बँकेत गहाण ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यावरून हगवणे कुटुंबाची आर्थिक लालसा किती होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्यूनर कार व ॲक्टिवा गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. लग्नात वैष्णवीला तिच्या माहेरकडून ५१ तोळे सोने, चांदीची भांडी आणि फॉर्च्यूनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या होत्या.

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. हगवणे कुटुंबीयांना सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली होती. इतके सर्व काही मिळाल्यानंतरही हगवणे कुटुंबाची लालसा वाढतच गेली. त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे, अनिल कस्पटे यांच्याकडे, दोन कोटी रुपयांची मागणी केली. यामुळे तिने आत्महत्या केली होती.

आता ५१ तोळे सोने नेमक्या कोणत्या कारणासाठी बँकेत गहाण ठेवले, यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. आता २ कोटी वडिलांनी देण्यास नकार दिल्याने हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ वाढवला, असा आरोप आहे.

लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरुन बोलणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले होते. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. मात्र तिने सगळं सहन केले. मात्र आता तिला या गोष्टी सहन होत नव्हत्या.

दरम्यान, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी सुनेला घालून-पाडून बोलून, तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. याबाबत आता पोलीस सखोल तपास करत आहेत. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!