संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले परदेशात पळाला? प्रकरणात मोठा ट्विस्ट, आतली माहिती आली समोर…


बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव चर्चेत आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले आहे. याप्रकरणात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी बीड पोलीस आणि सीआयडीने एकूण ९ पथके तयार केली असून जवळपास १५० लोकांचा समावेश आहे. त्यानंतरही मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर तीन आरोपींचा शोध घेण्यात सीआयडीला यश आलेले नाही.

तसेच त्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक मारेकरी, सुदर्शन घुले, देशाबाहेर पळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुदर्शन घुले हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि तो यापूर्वी नेपाळला गेला होता. त्यामुळे सीआयडीची पथके सुदर्शन घुलेचा शोध घेत आहेत.

दरम्यान, त्याने नेपाळमध्ये लपल्याची शक्यता असून, त्याचा शोध घेतला जात आहे. सीआयडीकडून देशाबाहेर पळाल्याबद्दल देखील तपास सुरु आहे. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात काही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. खास करून, वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता, आणि त्यानंतर सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!