अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची काही व्यक्तींनी रेकी केलेली?रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ


मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटून गेल्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. विमान अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाली होती?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी असं म्हटलं आहे की, अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळ परिसरात काही संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, सीआयडी आणि सीआयबीने यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या रेकीचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, हे शोधणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

दरम्यान अजितदादा ज्या विमानात बसलेले होते त्या विमानाच्या व्हीएसआर कंपनीवर देखील रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत.संबंधित विमान कंपनीच्या मालकाने”आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, सरकार आमची विमाने वापरत आहे,” असा दावा केल्याच पवारांनी सांगितले. कंपनीला हा आत्मविश्वास नेमका कोठून मिळतो आणि त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, अशी शंका त्यांनी उपस्थित केले आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत. याचा उलगडा कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!