पंपावरचं पेट्रोल चोरुन धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले!! अजित पवारांच्या वक्तव्यामुळे वाद, अंजली दमानिया म्हणाल्या, सिंचन घोटाळा..


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सभा घेतली. यावेळी अजित पवार यांचे धीरुभाई अंबानींविषयीचे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून अजित पवारांवर टीका केली आहे.

पंपावरचं पेट्रोल चोरुन धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले, असे वक्तव्य त्यांनी केले होते.असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजितदादा नेमके काय म्हणाले हे सांगितले. ‘पंपावरचे पेट्रोल सोडून धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले. पेट्रोलचा पंप चारचाकीमध्ये सोडून नोकरी करणे असा त्यांचा म्हणण्याचा आशय होता, असे ते म्हणाले.

अजित पवार सभेत म्हणाले होते, मला सहकार टिकायचे नसते तर पंप काढले असता का? गोरगरिबांची मुलं तिथं कामाला लागली. मुले पंपावर कामावर लागणं हे माझ्यासाठी कमीपणाचं नाही. कुठलेही काम करणं कमीपणाचं वाटू घेऊ नका. जे पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण सोनं निर्माण करु.

विरोधी पक्षांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हे विधान पोस्ट केले जात होते. यावरून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला जात होता. राज्यातील २०० कारखाने अडचणीतून चाललेत. त्यात १०० खासगी आणि १०० सहकारी आहेत. उंटावरुन शेळ्या राखून काम होत नाही. जीव ओतून काम करावं लागतं, असे अजित पवार म्हणाले होते.

यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी x वर पोस्ट केली आहे. ‘पंपावर पेट्रोल चोरून कोर्याधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलंत?, असा सवाल दमानिया यांनी केला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच अमोल मितकरी X (पूर्वीचे द्विटर) पोस्ट म्हणतात, सोडून ऐवजी चोरून हा शब्द तुम्हाला ऐकायला येतोय.

पेट्रोल सोडून म्हणजे पेट्रोलचा पंप चारचाकीमध्ये सोडून नोकरी करणे असा इतकेही समजून घेण्याचे औदार्य नाहीये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. यामुळे यावरून टीका सुरु आहेत. अजित पवार यांची ही विडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!