Dharmaveer 2 : बहुचर्चित धर्मवीर 2 ची रिलीज तारीख बदलली, नेमकं कारण काय? निर्माते काय म्हणाले?

Dharmaveer 2 : प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘धर्मवीर 2′ पाहण्याची प्रेक्षकांना आतुरता आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
धर्मवीर-2’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘धर्मवीर 2’ चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यामागचं कारण देखील सागितले आहे.
तसेच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच हिट झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रसाद ओकला पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना होती.
येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. Dharmaveer 2
दरम्यान, ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. राज्यात सध्या सुरु असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हे निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलले आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढची तारीख मात्र समोर आलेली नाही.
प्रसाद ओक पुन्हा एकदा ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यंदा हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. आधी ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट पुन्हा कधी रिलीज होणार ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.