पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना डावललं ; भाजपची साथ महत्त्वाची, धंगेकर दुय्यम?


पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुतीची पहिली महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. मात्र या बैठकीतून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 40 वर्षांचा गड हादरवणारे रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाच्या बैठकीतून शिवसेनेचे स्थानिक नेते रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आल आहे. भाजपने धंगेकरांना बैठकीत बोलावण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिंदे सेनेने आपल्या स्थानिक नेत्याला निमंत्रण न देता भाजप सोबत ही बैठक उरकली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदार बनलेल्या रवींद्र धंगेकरांनी नंतर लोकसभेत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या पराभवानंतर सत्तेत नसल्यास कामे होत नाहीत अस सांगत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र शिवसेनेत आल्यानंतरही त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सातत्याने टीका सुरूच ठेवली. हाच आक्रमक पवित्रा आता त्यांना महागात पडत असल्याचा दिसून येत आहे.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, खासदार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष गणेश बिडकर, तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, बापू शिवतरे, नाना भानगिरे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र, महायुतीतीलच एक प्रमुख चेहरा असलेल्या धंगेकरांना निमंत्रणच न मिळाल्याने ‘धंगेकर मुद्दाम डावलले का?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!