धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत! बीड विनयभंग प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडेंसोबत, फोटो व्हायरल…

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. असे असताना आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. असे असताना रात्री आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सध्या याबाबत तपास सुरु आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आणि आज मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. पत्रकार परिषदेनंतर आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय. यामुळे पुन्हा एकदा ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत धनंजय मुंडे म्हणाले, की, ‘ज्या कोचिंगला आमची भगिनी माय माऊली जात होती. त्याच कोचिंगच्या मालकाने आणि पार्टनरने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत चौकशी व्हावी.
तसेच यांच्यावर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी हे मिळून कारस्थान केलं का? जेव्हा हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर इतर अनेक पीडित कुटुंबं समोर आली. यामुळे याबाबत सगळ्या गोष्टींची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.