मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडेंना मोठा धक्का! झाला ४२ लाखांचा दंड, नेमकं काय घडलं?

मुंबई : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh Case) मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

असे असताना आता धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी बंगल्यासंदर्भात (Satpura Bungalow) आता महत्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी साडे चार महिन्यांपूर्वी मंत्री पदाचा राजीनाम दिला. पण अद्याप शासकीय निवासस्थान सोडले नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
या बंगल्यात वास्तव्यास येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे प्रतीक्षेत आहेत. धनंजय मुंडे यांनी अद्याप शासकीय निवासस्थान सोडले नसल्याची बाब समोर आली आहे. मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात बंगला सोडणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पद हे छगन भुजबळांना मिळाले आणि सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला.

पण बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. बंगला न सोडल्याने धनंजय मुंडे यांना दंड लावण्यात आला आहे. त्याची रक्कम आता 42 लाखांपर्यंत पोहचली आहे. यामुळे मुंडे नेमकं सरकारी घर कधी सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या कृषिमंत्रीपद बदलण्यात आले. माणिकराव कोकाटे यांच्याकडून हे पद काढून दत्तामामा भरणे यांना देण्यात आले.
यावेळी मुंडे देखील देवेंद्र फडणवीस यांना भेटत होते. यामुळे पुन्हा एकदा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, असे बोलले जात होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे आता तरी धनंजय मुंडे हे बंगला सोडणार का? हे लवकरच समजेल तसेच दंडाची रक्कम देखील भरणार का? हे लवकरच समजणार आहे. याबाबत त्यांनी अजून कोणती प्रतिक्रिया दिली नाही.