धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा मोठा दणका ! दिले महत्वाचे आदेश, नेमकं काय घडलं?


बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. असे असताना आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांची पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता एक महत्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा यांना आणि तिच्या मुलीच्या खर्चाची द्यायची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी कनिष्ठ न्यायालयातील एक याचिका रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथे त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याचे करुणा यांनी सांगितले आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी गुरूवारी (दि.१९) मला दिलासा दिला आहे. माझ्या अंदाजे ३५ ते ४० लाख रुपयांच्या रक्कमेपैंकी ५० टक्के रक्कम, सुमारे २१ ते २२ लाख रुपये आणि माझ्या मुलीच्या देखभालीची १०० टक्के रक्कम (अंदाजे २६ लाख रुपये) न्यायालयात जमा करण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत.

असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना हे पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंडे यांना न्यायालयाने हा मोठा दणका दिला असल्याचे सांगितले जात आहे. करूणा यांनी पुढे आरोप केला आहे की, मुंडेंना मला पैसे द्यायचे नाहीत, म्हणूनच ते कोर्टात गेले. मात्र त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.

माझ्याकडे ५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती, ती मला विकावी लागली. निवडणुकीच्या वेळी मी माझं मंगळसूत्र देखील त्यांच्यासाठी गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते. असेही करूणा मुंडे यांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल. याबाबत सध्या सुनावणी सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!