धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ, म्हणाला, माझे बाबा…


मुंबई : करूणा शर्मा या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांनी पोटगी म्हणून त्यांना दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर करूणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.

धनंजय मुंडे यांच्याकडून आपला कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. आपण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तेव्हा तिथे धनंजय मुंडे हे देखील तिथे होते.

पण तरीही आपल्याला वाल्मिक कराड सारख्या गुंडांनी मारहाण केली, असे खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपांनंतर आता करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने प्रतिक्रिया दिली आहे.

मी सिशिव धनंजय मुंडे आहे. मला माध्यमांसोबत बोलणं आता महत्त्वाचं वाटत आहे. कारण माझ्या कुटुंबाला आता मनोरंजनाचं माध्यम बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मला बोलणं भाग आहे. माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत. पण ते माझ्या आईसारखे आम्हाला हानिकारकही नाहीत, असं सिशिव आपल्या पोस्टमध्ये सुरुवातीला म्हटला आहे.

माझी आई करुणा मुंडे वडील धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत आहे. करुणा मुंडे जे आरोप करत आहेत तसा त्यांना त्रास नाही. याउलट मी, माझी बहीण आणि वडील धनंजय मुंडे यांना त्रास झालेला आहे. आम्हाला आईकडून त्रास होत आहे, असं सिशिव मुंडे म्हणाला आहे.

आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीने त्रास द्यायची. ती कौटुंबिक छळ झाल्याचा जो दावा करते तो खरंतर तिने आमचा म्हणजे मी, बहीण आणि माझ्या वडिलांचा छळ केला. तिने माझ्या वडिलांना मारहाण केली. त्यामुळे वडील घरातून निघून गेले.

तिने आम्हालाही निघून जायला सांगत संबंध तोडले. २०२० पासून माझे वडीलच माझी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही. ती माझ्या वडिलांचा सूड घेण्यासाठी काहीना काही बनाव रचत राहते, असं सिशिव मुंडे म्हणाला आहे.

माझे वडील हे सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हते. याउलट आईने जाणीवपूर्वक घराचे हफ्ते भरले नाहीत. त्यामुळे आम्हाला आर्थिक विवंचना आहे, असं त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही आर्थिक विंवचनेत नाहीत, असं सिशिव मुंडे याने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!