Dhammika Niroshana : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! माजी क्रिकेटपटूची गोळ्या झाडून हत्या, घटनेने उडाली खळबळ…
Dhammika Niroshana : श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूवर गोळ्या झाडण्यात आल्या. ४१ वर्षीय या क्रिकेटरवर राहत्या घरी पहाटेच्या वेळेला काही अद्याप लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४१ वर्षीय श्रीलंकन माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशनावर राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या. काही अज्ञात इसमांनी निरोशनावर गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोशनावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते घरी एकटे नव्हते. हल्ला झाला तेव्हा निरोशनासोबत त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुलेही तेव्हा घरात उपस्थित होती. पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या.
हल्लेखोराने हा हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहे. अंबालगोड पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला असून हा अज्ञात आरोपी सध्या तरी फरार आहे. निरोशना यांनी श्रीलंकेकडून खेळताना श्रीलंका संघाचे नेतृत्वही केले आहे. Dhammika Niroshana
दरम्यान, श्रीलंकेच्या अंडर-१९ वर्ल्ड कप संघाची धुरा त्यांनी संभाळली होती. २०००मध्ये सिंगापुरविरुद्धच्या सामन्यात निरोशना यांनी पदार्पण केले असून अंडर-१९ साठी ते दोन वर्षे वन दे आणि कसोटी क्रिकेट खेळले. यादरम्यान निरोशना यांनी दहा सामन्यात संघाचे नेतृत्वही केले आहे.