अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर खळबळ उडवणारी माहिती पुढे, DGCAचा ऑडिट अहवाल…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.

एका शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर फक्त एकच मोठा स्फोट झाला नाही तर चार ते पाच मोठी स्फोट झाली. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे अजित पवार यांचे विमान कोसळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
ऑडिट अहवाल जाहीर…
या अपघाताची चौकशी सुरू असून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तपासणी केली जात आहे. पवार हे VSR कंपनीच्या लिअरजेट 45 विमानातून प्रवास करत होते. या पार्श्वभूमीवर डीजीसीए ने संबंधित कंपनीचा सविस्तर ऑडिट अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात लिअरजेट 45 प्रकारातील एकूण 45 विमानांची तपासणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विमानाने नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर…
तपासात संबंधित विमानाने नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तसेच देखभाल प्रक्रियेत त्रुटी आणि नियमांचे पालन न झाल्याचे गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर DGCAने संबंधित लिअरजेट 45 विमानांचे उड्डाण तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अपघातानंतर समोर आलेल्या या अहवालामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तांत्रिक बिघाड आणि सुरक्षा प्रक्रियांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणा पुढील कारणमीमांसा करत असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे