तुळजाभवानी भाविकांसाठी मोठी बातमी! तोकडे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी..
पुणे : तुळजापूर मंदिरामध्ये तोडके कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. मंदिरात असभ्य कपडे घातल्यास वस्त्र घातल्यास मंदिरात प्रवेश दिल्या जाणार नाहीत. यासंदर्भात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आले आहेत.
तसेच मंदिरात दर्शनाला आलेल्या कुटुंबातील एका सहा वर्षाच्या मुलाला मंदिरात प्रवेश नाकारला आहे. या मुलाने बर्मुडा घातल्यामुळे त्याला मंदिरात प्रवेश नाकारला. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
भाविकांच्या भक्तीकडे आपण पाहिले पाहीजे त्याच्या कपड्यांकडे नाही. तुळजापूर संस्थानने लावलेला बोर्ड संविधानाचा अपमान आहे. तातडीने हा बोर्ड काढावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
दरम्यान कोणी कोणते कपडे घालावे, याचे व्यक्तिस्वतंत्र सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाचे कपडे असभ्य कसे असतील असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे.