संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी घेतले थेऊर येथील श्री चिंतामणीचे दर्शन…!
उरुळी कांचन : आज माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी पाचवे स्वयंभू स्थान असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी चरणी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
पहाटे राजेंद्र आगलावे यांनी श्रींची पूजा केली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानाचे विश्वस्त ह. भ. प. आनंद महाराज तांबे हि उपस्तिथ होते.
विध्यार्थ्यांच्या परिक्षेचा हंगाम व आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे भाविकांची ओघ मर्यादित होती. सायंकाळानंतर गर्दीत वाढ होत गेली. चिंचवड देवस्थान व आगलावे बंधूच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ऊन जास्त असल्याने भाविकांच्या सोयीसाठी मंदिराबाहेर दर्शन बारी ,भव्य मंडप, पायघड्या व सावलीकरिता हिरवी जाळी बांधण्यात आली होती.
याचदरम्यान , दुपारी भाविकांना देवस्थानाच्या वतीने उपवासाची खिचडी व चिवडा वाटण्यात आला .सायंकाली श्री क्षेत्र देवाची आळंदी येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज पवार यांचे कीर्तन झाले.
चंद्रोदयानंतर उपस्तिथ भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. याचदरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वाहनासाठी पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व व्यवस्थेवर विश्वस्त ह. भ. प. आनंद महाराज तांबे यांचे लक्ष होते.