कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांना पुजाऱ्यांकडून मारहाण; मंदिर प्रशासनाच म्हणणं काय?

कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा मंदिरात भाविकाला पुजार्याकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर मंदिर प्रशासनाने पुजारी एवढी का संतापले आणि या भाविकांना का मारहाण केली यामागील कारण सांगितल आहे.

ज्योतिबा मंदिराच्या आवारात मुख्यार्थी चालू असताना काही भक्त शासनकडे घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होते. प्रदक्षिणे दरम्यान काही तरुणांनी अतिउत्साहात हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. आरतीमध्ये अडथळा निर्माण करण्यासह या तरुणांनी उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे आणि त्यांच्या डोक्यावरील पारंपरिक टोप्या उडवण्याचे प्रकार केले. संतापलेल्या पूजा राणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र तरुणांची हुल्लडबाजी थांबत नसल्याचे पाहून संतापलेल्या पुजाऱ्यांनी काही भक्तांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुजारी समाजाचे बदनामी करण्याचा कट असल्याचं दाखवण्यात आल्यास मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे. श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरच्या व्हिडिओची सत्य परिस्थिती आणि दारू केलेल्या भाविकांची चूक न बघता पुजारी समाजाची बदनामी करण्याचा कट अशी पोस्ट मंदिर प्रशासनाने सोशल मीडियावर लिहिली आहे.

दरम्यान या प्रकारानंतर काही लोक पुजाऱ्यांच्या कृतीचा निषेध करत आहेत, तर काही जण धार्मिकस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना धडा शिकवणं गरजेचं आहे, असे मत व्यक्त करत आहेत