लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार ! उबाठा गटाच्या बड्या नेत्याने केलेल्या विधानाने खळबळ ..!!


    Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा निवडणुकीची  रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. सभांदरम्यान राजकीय नेते एकमेकांवर टीकादेखील करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक होणार असल्याचा दावा बड्या नेत्याने केला आहे.

 

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्यात आमचं सरकार येऊ द्या मग देवेंद्र फडणवीसांना अटक होतेय का नाही ते बघा. फडणवीस यांनी फोन टॅपिंग केले आहे. तर नरेंद्र मोदी यांनी मागील काही काळात खोटं बोलणारी पिढी निर्माण केली आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

 

“उद्धव ठाकरे  यांनी रंग बदलले असे तु्म्ही म्हणता. पण तुम्ही काय बदललं? यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हा गुण घेतला नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एक नंबरचे डरपोक असून नरेंद्र मोदी हे अपघाताने पंतप्रधान झाले आहेत. पण 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!