Devendra Fadnavis : विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांचे निवडणूक कल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. या आलेल्या निकालानंतर अनेक जणांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

लोकसभेची सेमीफायनल असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निर्णायक बहुमताकडे झेप घेतली आहे.
तेलंगणात काँग्रेसने बाजी मारत भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सत्तेतून बाहेर केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाच्या पार्श्वभुमीवर आपल्या ‘X’ म्हणजेच ट्विटर खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की , “विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत आहे.” Devendra Fadnavis

दरम्यान, राजस्थानमध्ये एकूण १९९ जागांवर मतदान झाले त्यापैकी १११ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ६२ जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांपैकी भाजपने १६६ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस ६२ जागांवर आघाडीवर आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये ९० जागांवर मतदान झाले असून भाजप ५४ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला फक्त सहा जागा मिळू मिळाल्या आहेत .