Devendra Fadnavis : मंत्रालयात राडा! महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं घडलं काय?


Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. Devendra Fadnavis

मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे.

एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली. ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!