Devendra Fadnavis : राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात?, संविधानाच्या कॉपीवरून फडणवीसांचा हल्लाबोल…
Devendra Fadnavis : राज्यात गेल्या पाच वर्षात झालेली राजकीय उलथापालथ आणि बदललेल्या राजकीय समीकरणानंतर होत असलेली विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यासह देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभा निवडणुकीत आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केलाय. तसंच फडणवीस यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. आता ते काँग्रेसच्या विचाराचे कमी अति-डाव्या विचारसरणीचे झाले आहेत. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहेत.
तसेच भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्हरमध्ये असते. मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगातीलच कव्हर घातलेलीच का दाखवतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याची माहिती आता महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या ‘एक्स’ हँडलवरदेखील प्रसिद्ध करत राहुल गांधीच्यावर टिकास्र सोडले आहे. Devendra Fadnavis
नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली. याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आता काँग्रेसी राहिले नाहीत. ते कम्युनिस्ट ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. ओरिजनल निळ्या रंगा ऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात. अराजक पसरवणाऱ्या आणि बंदी असलेल्या नक्षलवाद्यांच्या गराड्यात ते असतात. त्यांची धोरणं ठरवतात आणि नरेटिव्ह सेट करतात.
भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण १८० अशा संघटनांनी त्यात भाग घेतला होता ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय तर त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे असंही फडणवीस म्हणाले आहे.