Devendra Fadnavis : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, नेमकं कारण काय?


Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. एसआयडीने दिलेल्या गोपनीय रिपोर्टमुळे देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अलर्टवर आली आहे. Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत

राज्यात विधानसभा निवडणुकिचा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपली असून ४ तारखेनंतर निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आला वाढ करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!