Devendra Fadnavis : मी पुन्हा येईल!!! अखेर भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

Devendra Fadnavis : संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे. कारण, महायुतीकडून आत्तापर्यंत ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे.

अशातच आता देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी आज (ता.४) एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचेच नाव भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे आज (ता. ४) सकाळी १० वाजता भाजप आमदारांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता. Devendra Fadnavis
दरम्यान, अखेर अनेक बैठकांनंतर या सगळ्यातून मार्ग निघाला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवलं.
या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.