Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणाले, २३ तारखेची…
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे की शरद पवार , कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थितीची येणारच नाही…२३ तारखेची वाट बघा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
तसेच मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही ठरवले आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवली नाहीय, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. Devendra Fadnavis
महायुतीमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिल्यानं विरोधकांकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, हे आम्ही अजित पवारांनासांगितले होते. मात्र अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांनीअसे का केले, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.