Devendra Fadnavis : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis नागपूर : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म.नि.प.नियम २८९ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!