Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्ताराआधी राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर….


Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटले. पण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र होते. अखेर दिल्लीवारी, बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे.

रविवारी, १५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. राज्यातील हालचालींना आता वेग आला आहे.

राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर निकालाच्या जवळपास १३ दिवसांनी ५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता उद्या रविवारी १५ डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

शुक्रवारी संध्याकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बावनकुळेंनी सागर बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झालेत. या दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. Devendra Fadnavis

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या, रविवारी नागपूरमध्ये राजभवनात पार पडणार आहे. महायुतीमधील इच्छुक आमदारांमध्ये आपल्या समावेशावरून धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आमदारांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. ते स्वत: उपस्थित राहण्याच्या सूचना देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा ज्या आमदारांना फोन जाणार, त्यांच्याच मंत्रीपदांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. त्याशिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आमदारांना त्यांच्या पक्षाचे नेते फोन करण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!