Devendra Fadnavis : पुणे अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, बिल्डर पुत्रावर…


Devendra Fadnavis पुणे : पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. पण ज्याने अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे.

पुण्यात रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्यचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आरोपी तरुणाला १२ तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने काही अटींसह त्याला जामीन दिला आहे. यामुळे अनेकांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणी आता सरकारने दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी याबाबत कठोर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Devendra Fadnavis

दरम्यान, या प्रकरणामधील आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही पाहून लगेचच संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!