Devendra Fadnavis : नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य…


Devendra Fadnavis : नांदेडच्या किनवटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर मोठे आश्वासन दिली आहे.

पुढील काळामध्ये नांदेडमध्ये उच्चपातळी बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. तसेच परिसरामधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत, असे आश्वासन फडणवीस यांनी नांदेड येथे नागरिकांना दिले आहे.

महायुतीचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थी सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले, भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी आपण एकत्र आलो आहोत. या पंचवार्षिक काळामध्ये पहिल्या २.५ वर्षात एक रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. Devendra Fadnavis

मात्र, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. इथून पुढ देखील आपलंच सरकार येणार आहे, त्यामुळे आता चिंता करायचं काम नाही. आता पाच वर्षासाठी सरकार आल्यानंतर किनवट मतदार संघातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासन सुद्धा त्यांनी मतदारांना दिले आहे.

नांदेड तसेच किनवट मतदार संघामधील पाणीप्रश्नाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून नोंद झाले आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही.

गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचे काम आम्ही सुरु केलं आहे. ते लवकरच पुर्ण करुन आम्ही शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!