Devendra Fadnavis : रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीच्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, विनाकारण शहीद…


Devendra Fadnavis : राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीकडून धाड टाकण्यात आली. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडूनही बारामती आणि पुणे कार्यालयावर कारवाई केली आहे .

या कावाईत काही कागदपत्रे जप्तही करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार रोहीत पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली, त्यामुळेच त्यांच्यावर अशी कारवाई होत असल्याचा आरोप केला जात आहे? असा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. Devendra Fadnavis

यावर ते म्हणाले, हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे. रेड झालीय, नाही झाली, याबाबत मला काही माहिती नाही. त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, अशा गोष्टी बिझनेसमध्ये होत असतात.

त्यांनी काही केलंच नसेल तर त्यांना घाबरण्याची गरजच नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच, विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचे काय कारण आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!