Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, जामनेरमधून गिरीश महाजन यांचा पत्ता कट, केली दुसऱ्याच उमेदवाराची घोषणा…


Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

तसेच दोन्ही आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. Devendra Fadnavis

गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच निवडणूक लढणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांच्या पत्नीची उमेदवारी थेट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखण्या जोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्या नंतर ते पूर्ण झाल्या शिवाय ते स्वस्त बसत नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!