Devendra Fadnavis : फेक नेरेटिव्ह कराल तर होणार मोठी कारवाई! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा…
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीपासून फेक नरेटिव्ह याचा उल्लेख अनेकदा करण्यात आला होता. तसेच आता राज्यातील पावसाळी अधिवेशनातही फेक नरेटिव्हचा मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील एक वेबसाईट राज्यात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हणत खोटे नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी विधानसभेत हे विधान केले आहे. पेपरफुटीच्या प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी पेपरफुटीची यादी वाचून दाखवली.
त्यानंतर फडणवीसांनी उत्तर देताना भास्कर जाधव यांनी फेक नरेटिव्ह मांडल्याचे म्हंटलं. भास्कर जाधव यांनी वाचून दाखवलेले कोणतेही घोटाळे झाले नाहीत. पुण्यातील एका वेबसाईटने हा मॅसेज सर्वात आधी व्हायरल केला. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला आता मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. Devendra Fadnavis
खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातल्या तरुणांमध्ये गैरविश्वास निर्माण करणे, एक लाख नोकऱ्या मिळाल्यानंतरही फेक नरेटिव्ह पसरवणे आणि यासाठी संघटित गुन्हेगारी म्हणून काम केले जात असल्याची शंका महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे.
त्यामुळे फेक नरेटिव्ह निर्माण करणे आणि परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर विर्जन टाकणे असे संघटित प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करणार का आणि राज्यात यासाठी कायदा आणणार का, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना याच विधानसभा अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.