माढा लोकसभेत देवेंद्र फडणवीस यांनी शोधला एक्का ! उत्तम जाणकर यांना देणार शह !!

माढा : आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार असून महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढा लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.
नुकतीच माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी निवडणुकीत माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार असल्याने याचा भाजपला फायदा होईल.
याच दरम्यान, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे साहजिकच उत्तम जानकर यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.