Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि..’


Devendra Fadnavis मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच काळ रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अचानक घडामोडी वाढल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमरास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. Devendra Fadnavis

त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ‘वर्षा’वर दाखल झाले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बैठक चालली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तर काय नवल आहे’. दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ आणि २ ऑक्टोबरला गडकिल्ले परिसर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, इंडिया आघाडीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्ताने मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!