भावी मुख्यमंत्री अजितदादा ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, कधीतरी…

पुणे : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे.

आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भावी म्हटलंय ना. कधीतरी त्यांचे राज्य येईल. कधीतरी ते येऊ शकतील, येईल तेव्हा ठरवतील कोण मुख्यमंत्री हे, त्याची लढाई आतापासूनच का? असे फडणवीस म्हणाले .
तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील पोस्टर अशाच प्रकारे लावण्यात आले होते. याची देखील बरीच चर्चा झाली होती. आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा, अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.

दरम्यान, अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल. मात्र सध्या आमच्याकडे त्यासाठीचे संख्याबळ नाही. असे म्हणत शरद पवारांनी या विषयावर बोलणे टाळले होते. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते.