Devendra Fadnavis : …तर मी सोडणार नाही!! देवेंद्र फडणवीसांचा भर सभेत धैर्यशील मोहिते पाटलांना दम
Devendra Fadnavis : राज्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे माढा लोकसभा मतदार संघाची. याठिकाणी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपशी बंडखोरी करत ‘तुतारी’ हाती घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.
या सगळ्या घडामोडींनंतर धैर्यशील मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर आले आहेत. आता फडणवीस यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, माळशिरसमध्ये सरंजामशाही कार्यकर्त्यांवर दडपशाहीत परावर्तित होत असेल, तर सोडणार नाही.
गुंडगिरीचे राज्य चालू देणार नाही, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होईल,’ अशी भूमिका यासाठी घेतली की, आमच्या कार्यकर्त्यांना काम करून दिलं जात नाही. भाजपच्या बैठकीला कार्यकर्ते आले, तर फोन करून धमकावलं जात आहे. पण, ही लोकशाही आहे. Devendra Fadnavis
तुम्ही मते मागा, आम्हीही मागतो. जनता कुणाला मत द्यायचा त्याला देईल. पण, ठोकशाही कराल, तर सहन करणार नाही. मी कुणाला दबत नाही आणि दबणारही नाही. अशाप्रकराची ठोकशाही सहन करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मी राजकारणी नाही. याला पाडा, त्याला पाडा असे छक्केपंजे मी कधीही करत नाही. माझ्याशी विश्वासघात केलेल्यांचा सत्यानाश झाला. कुणाची आधी झाला, कुणाचा नंतर झाला.
जुन्या काळात केलेली पाप लपवली, असेही फडणवीस म्हणाले.