Devendra Fadnavis : मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, आरक्षणाचा विषय मिटणार? देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य…
Devendra Fadnavis : मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
तसेच राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी दोन जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधन समोर आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. Devendra Fadnavis
न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झालं पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पालन करू. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरिता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.