Devendra Fadnavis : ललित पाटील संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले मोठं नेक्सस बाहेर…

Devendra Fadnavis पुणे : ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. ललितच्या अटकेनंतर आता याप्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सूचक विधान केले आहे.
ललित पाटील संदर्भातील मला सर्व ब्रीफ करण्यात आले आहे. मी आणखी या संदर्भात माहिती घेत असून लवकरच मोठा नेक्सेस बाहेर पडेल. असं सूचक विधान महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. Devendra Fadnavis
ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. ते म्हणाले या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, प्रत्येकावर योग्य ती कडक कारवाई केली जाणार आहे. लवकरच या संदर्भातील नेक्सेस बाहेर पडतील. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी पळालो नाही, मला पळवले, असे ललित पाटील म्हटले, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते सगळेच बाहेर येणार आहे. पोलिसांच्या कारवाईतून एक मोठे जाळे बाहेर येणार आहे आणि बोलणाऱ्याची तोडे बंद होणार आहेत. आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतोय, त्यापेक्षा जे ड्रग्जचे जाळे बाहेर येणार आहे. त्याने अनेकांची तोंडे बंद होणार आहेत.
दरम्यान, शिंदे गटाला लोकसभेसाठी २२ जागा देणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला नकार दिला. ते म्हणाले ज्याला जितक्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्ही देऊ याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. असेही राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.