Devendra Fadnavis : प्रशासनात महिलराज!! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, ‘मुंबईची मेट्रो वुमन’ थेट मंत्रालयात, सोपवली मोठी जबाबदारी..

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधाव सचिव असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची त्या जागा घेतील. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केल्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार होता. Devendra Fadnavis

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयाचा कार्यभार ब्रिजेश सिंह हे पाहत होते. अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. त्या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी असून त्यांना २९ वर्षांचा सनदी सेवेतील अनुभव आहे.
आश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील २५ वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोच्या जबाबदारीमुळे त्यांना ‘मेट्रो वुमन’ म्हणून देखील ओळखले जाते. आता त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
अश्विनी भिडे यांचा प्रवास रंजक आहे. त्यांचे शिक्षण तासगाव, कराड, जयसिंगपूर या भागातील मराठी शाळांमध्ये झाले. त्या १९९५ बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
