सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन, शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या आरोपाने खळबळ.


 

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मटन खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचे मटण थाळी खातानाचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत केली टीका. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी महादेव आणि सासवडला सोपणकाक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवतारे यांच्या पोस्ट मध्ये ”येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ” अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!