७५ टक्के मिळवूनही १० वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, विद्यार्थी आणि पालकांना हादरवणारे कारण आलं समोर…

पुणे : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. राज्यातील कूण निकाल ९४ टक्क्यांच्या आसपास लागला.

या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००० टक्केही मिलवत घवघवीत यश संपादन केलं. मात्र याच निकालामुळे नैराश्य येऊन १० वी पास झालेल्य एका अल्पवयीन मुलाने टोकाचं पाऊल उचललं.

तसेच १० वीच्या परीक्षेत मित्रांना चांगले मार्क मिळाले, पण त्यांच्या तुलनेत मला मात्र कमी मार्क मिळाले, याच नैराश्यातून पिंपरी-चिंचवड येथे एका मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. उमंग रमेश लोंढे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या या आत्मघाती कृतीमुळे आई-वडिलांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमंग हा नुकताच १०वी उत्तीर्ण झाला. त्याने चिंचवडमधील माटे शाळेतून दहावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी रिझल्ट लागल्यावर उमंगला ७५ टक्के मिळाले. पण त्याच्या इतर मित्रांना मात्र त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. उमंग याच्या इतर मित्रांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले. मात्र त्याला ७५ टक्के गुण मिळाले होते, पण याच गोष्टीमुळे त्याला नैराश्य आलं होतं.यामुळेच तो खूप निराश होता.
गुरूवारी (काल) सकाळी उमंगची आई ऑफीससाठी निघाली. तिला सोडण्यासाठी त्याचे बाबाही गेले होते. तेव्हाच त्याने टोकाचं पाऊल उचललं. ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात त्याने आयुष्य संपवलं. पत्नीला ऑफीसला सोडून उमंगचे बाबा घरी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
आपल्या मुलाने गळफास घेतल्याते पाहून त्याच्या वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी उमंगला घेऊन त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
