धक्कादायक! मुलं संस्कारी निघाले नाहीत म्हणत हतबल बापाची फेसबुक पोस्ट करुन आत्महत्या…!

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मी आत्महत्या करत आहे’ अशी फेसबुकला पोस्ट लिहिली आणि त्यानंतर या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे, मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नाहीत. असेही म्हटले आहे.
दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मोठ्या कष्टाने मुलांचं शिक्षण केलं, पण मुलांची साथ मिळाली नसल्याच्या दुःखातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.
मला माफ करा मी टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील त्यात म्हटले आहे. दत्तात्रय सोरमारे हे गावातील प्रतिष्ठित नागरिक होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Views:
[jp_post_view]